शिक्रापूरमध्ये स्कुलबसच्या चाकाखाली चिमुरडीचा मृत्यू

शिक्रापूर, ता. २ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : शिक्रापुर येथे स्कूलबस (व्हॅन) चे चाक अंगावरुन गेल्याने झालेल्या अपघातात सव्वा वर्षाची चिमुरडी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

या अपघातात श्रध्दा एकनाथ वीरगंटी (एक वर्ष तीन महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. यासंदर्भात शिक्रापुर पोलिस ठाण्यात श्रृती एकनाथ विरगंटी (रा.साई पर्ल सोसायटी पाबळ चौक,शिक्रापुर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरगंटी या त्यांचे पती व कन्या स्वराली व श्रध्दा यांसह शिक्रापुर येथे राहण्यास आहेत. त्यांची स्वराली ही मुलगी श्री.सिध्दी विनायक पब्लिक स्कूल मध्ये ज्यूनियर केजी त शिकत  आहे.स्कूल व्हॅन स्वरालीला घेण्यासाठी बिल्डिंग समोर आली होती. स्वरालीला स्कूल बस मध्ये सोडविण्यासाठी तीची आई श्रध्दा हीला कडेवर घेवून खाली आल्या.

स्वरालीला स्कूल बस मध्ये बसविले व श्रध्दाला खाली सोडले असताना खेळत असताना स्कूलबसचे पुढील चाक तीच्या अंगावरुन गेले. या वेळी स्कूल बसचा ड्रायव्हर निघुन गेला. बिल्डिंगमधील लोकानी व इतरांनी श्रध्दाला उपचाराकरिता खाजगी दवाखान्यात नेले. परंतु, उपचारापुर्वीच ती मरण पावल्याचे डॉक्टरानी सांगितले. स्कूलव्हॅनचा चालक जितेंद्र विलास गायकवाड यांच्या विरोधात विरगंटी यांनी तक्रार दिली असून आधिक तपास शिक्रापुर पोलिस करित आहेत. दरम्यान या चिमुकलीच्या अपघाती निधनाने विरगंटी परिवाराबरोबरच बिल्डिंग मधील रहिवाश्यांना ही मोठा धक्का बसला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या