शिक्रापुरात सर्पमिञांकडून दोन सापांना जीवदान

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoor
शिक्रापूर, ता.३ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी)  : तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथे आज गुरुवार (दि.२ ऑगस्ट) रोजी धामण जातीच्या दोन वेगवेगळ्या सापांना येथील सर्पमित्रांनी पकडून सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. त्यामुळे एकाच दिवसात दोन सापांना जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले आहे.       

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय शेजारी राहत असलेल्या शिरूर बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे  यांच्या घराजवळ गुरुवारी सकाळी एक साप असल्याचे त्यांच्या घरातील महिलांना दिसून आले. त्यानंतर सर्पमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्यांचा सहकारी मित्रा प्रवीण बामणे याच्यासह त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी बंगल्याच्या संरक्षक भिंतीच्या आतमध्ये एक धामण जातीचा साप असल्याचे  दिसले.

त्यावेळी शेरखान शेख यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने त्या सापाला पकडून जेरबंद केले. त्यानंतर लगेचच तळेगाव ढमढेरे जवळील आरंभ सोसायटीच्या आतमध्ये एका झाडावर एक मोठा साप खेळत असल्याचे तेथील किरण फंड व इतर नागरिकांना दिसले. त्यावेळी देखील सर्पमित्र शेरखान शेख यांना बोलाविण्यात आले तेव्हा देखील शेख व बामणे यांनी त्या ठिकाणी तातडीने जावून पाहणी केली असता झाडावर सुद्धा धामण जातीचा साप असल्याचे दिसून आले. तेव्हा सर्पमित्र शेख यांनी त्या धामण सापाला झाडावरून खाली घेत पकडून ताब्यात घेतले. पकडलेल्या दोन्ही सापांना जंगलात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. पाउस पडल्यानंतर जमिनीमध्ये होत असलेल्या तापमान बदलामुळे साप बाहेर पडत असून कोठेही साप आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलाविण्याचे आवाहन सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या