शिरुर तालुक्यात बंद निमित्त कडक बंदोबस्त (video)

शिरुर, ता.८ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंद  च्या पार्श्वभुमीवर कडक पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना घोडके यांनी सांगितले कि, शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने ६ पोलीस अधिकारी, ५० कर्मचारी, १ दंगल नियंञण पथक, २७ होमगार्ड तैनात केले असुन कडक बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान, शिरुर बसस्थानकाच्या वतीने संपुर्ण दिवसभर एसटी सेवा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती मिळते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या