आश्रमशाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

Image may contain: 8 people, people standingमुखई,ता.११ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : मुखई येथील कै.रामराव गेणूजी पलांडे माध्य.आश्रम शाळेने गुणवत्ता शिष्यवृत्तीची परंपरा  कायम राखली असून तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

मुखई (ता. शिरूर) येथील पलांडे आश्रमशाळेत ग्रामिण भागातील भटक्या विमुक्त जाती, जमाती, भराडी , बेलदार, वडारी,भामटा, धनगर, लमाण, नंदीवाले, रामोशी, अशा अनेक भटकंती करणाऱ्या  गोरगरीब समुदायाची मुलं निवासी राहून शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी संस्था व शाळा सातत्याने नवउपक्रम राबवून या मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न शाळेतील प्रत्येक कर्मचारी करतांना दिसतात म्हणूनच शाळेचे प्रत्येक वर्षी इ.८वीचे विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकतांना दिसतात.

यावर्षीही  माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनुजा सुदाम पडळकर (२३२ गुण) , शिल्पा बाळू राहीले (२१० गुण) व प्रथमेश विष्णू सांगळे (१८६ गुण) या विदयार्थांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  के.एस.गोगावले, पांडुरंग गायकवाड, अनिता  डमरे, मनोज धिवार यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे, कार्याध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोरे यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या