शिरुर तालुक्यात दिवसभरात कोठे काय घडलं? (Video)

शिरुर, ता. ११ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात आज कोठे कोठे काय घडलयं. या संपुर्ण दिवसभराचा आढावा घेतलाय शिरुरचे ब्युरो करस्पॉडंट मुकुंद ढोबळे यांनी.

शिरुर तालुक्यातील दिवसभराच्या टॉप घडामोडी :

१) आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस अन लागुनच आलेली शनि आमावस्या यामुळे शिरुर तालुक्यात ठिकठिकणी शनिमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. शिरुर शहरात शनिमंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
२) काही दिवसांवर येउन ठेपलेले धार्मिक सन-उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी शिरुर शहर हद्दीतील जनतेने पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी केले आहे.
३) वडगाव रासाई येथे विदयुत रोहिञाला चिकटुन वानराचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
४) विठ्ठलवाडी येथे पांडुरंग विद्यालयास उद्योजकांच्या वतीने क्रिडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या