आरोग्य सेविकेने केली प्रसुती; अर्भकाचा मृत्यू

Image may contain: one or more people and closeup
केंदूर
, ता. 13 ऑगस्ट 2018:
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गर्भवतीचे बाळंतपण एका आरोग्य सेविकेकडून करण्यात आले. डॉक्‍टरांच्या अनुपस्थितीत झालेल्या या प्रसूतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला असून, शिरूर तालुक्यातील आरोग्य विभागांची दुरावस्था समोर येऊ लागली आहे.

शिरूर तालुक्यातील विविध आरोग्य विभागांची दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेतूनच एका अर्भकाचा मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यातील आरोग्य विभागांकडे कोणाचेही लक्ष नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

रविवारी (ता.12) सकाळी साडेसातच्या सुमारास धामारी (ता. शिरूर) येथील अर्चना विठ्ठल डफळ यांना त्यांचे पती विठ्ठल डफळ हे बाळंतपणासाठी केंदूर आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. दवाखान्यात उपस्थित दोन आरोग्य सेविकांनी अर्चना यांना दाखल करून घेतले व दोन तासात प्रसूती होईल, असे सांगितले. यावर अगदी काही वेळांत या दोन्ही नर्सनी डफळ यांना अर्चनासाठी काही इंजेक्‍शन्स बाहेरून घेऊन यायला सांगितले. या वेळी डफळ बाहेर जाताच त्यांना पुन्हा लगेच फोन करून सांगितले गेले, की तुमचे बाळाचे हात आडवे असल्याने अर्चना यांचे बाळंतपण येथे होणार नाही म्हणून गाडी आणा आणि रुग्ण लगेच पुण्यात न्या. यावर डफळ हे बाहेर खासगी गाडी पाहायला गेले. गाडी न मिळाल्याने त्यांनी 108 नंबरवर कॉल करून गाडी बोलावून घेतली. सकाळी साडेनऊच्या सुमारास 108 नंबरची गाडी येईपर्यंत येथील डॉक्‍टर माया पवार आल्या व त्यांनी बाळ मृत असल्याचे जाहीर केले. पत्नीचे आरोग्य ठीक होताच आपण या प्रकरणी कायदेशीर दाद मागणार आहोत, असे डफळ यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. माया पवार यांनी सांगितले, की अर्चना डफळ यांची प्रसुती आपण केली असून, बाळ पोटातच मृत झाले होते. या प्रकरणी अधिक माहिती आपण घेऊन देऊ.

केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्चना डफळ या गर्भवतीचे बाळंतपण एका आरोग्य सेविकेकडून करण्यात आले. डॉक्‍टरांच्या अनुपस्थितीत झालेल्या या प्रसूतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य केंद्राकडून बाळ पोटातच मृत असल्याचा दावा करण्यात आला असून, डॉक्‍टरसह कुठलीच वैद्यकीय सेवा मिळाली नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप अर्चना यांचे पती विठ्ठल डफळ यांनी केला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमात मृत अर्भकाचे शवविच्छेदन पुण्यात करावे लागेल, असे सांगितले गेल्यामुळे आमची कुठलीच तक्रार नसल्याचे लिहून द्यावे लागल्याचेही डफळ यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या