शिरूर-चौफुला रस्त्यावर अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

Image may contain: 1 person, outdoorशिरूर, ता. 14 ऑगस्ट 2018: शिरूर-चौफुला रस्त्यावर ट्रक व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पिकअप मधील बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 13) सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. या अपघातात अन्य तीनजण जखमी झाले आहे.

कैलास रामपाल बंजारा (वय २२), रामपाल मधाराम बंजारा (वय 65, सध्या रा. केडगाव चौफुला, ता. दौंड, मूळ रा. कूचेरा, जि. नागोर, राजस्थान) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बापलेकांचे नाव आहे. बूधाराम बंजारा, सुनील गिरी, नेमाराम चौधरी हे तिघे या अपघातात जखमी झाले आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवारी सकाळी राजस्थान येथील आपल्या कूचेरा गावी जाण्यासाठी बंजारा कुटुंब हे शिरूर-न्हावरे फाटा येथे येऊन येथून ट्रॅव्हल्सच्या गाडीने जाणार होते. त्यासाठी त्यांनी केडगाव (ता. दौंड) येथून पीकअप जीप (एम एच 12 पी क्यू. 9594) हिने न्हावरे फाटा येथे निघाले होते. पिकअप जीप करडे घाट जवळील केणॉलजवळ आली असता पिकअप जीप व न्हावरे फाटा बाजूने समोरून येणारा ट्रक (क्रमांक एन एल 01एन 8690) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये पिकअप जीपचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. पिकअप जीप मधील दोघांचा मृत्यू झाला असून, तीनजण जखमी झाले आहे. बंजारा कुटुंब केडगाव चौफुला येथे फर्निचर बनवण्याचा व्यवसाय करीत होते. गावाहून आलेल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी न्हावरे फाटा येथे निघाले होते, न्हावरे फाटा एक किमी अंतर राहिले असता बंजारा कुटुंबावर काळाने घाला घातला.

दरम्यान, याबाबत देवीसिंग हरिसिंग रजपूत यानी खबर दिली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे मोटर अपघात नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या