करडेत चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद (Video)

Image may contain: one or more people

करडे,
ता. 14 ऑगस्ट 2018:
येथील नाथकृपा मेडिकलमध्ये रविवारी (ता. 12) रात्रीच्या सुमारास चोरी झाली असून, चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत अजय सुरेश दिवेकर यांनी न्हावरे पोलिस दूरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे, अजय दिवेकर यांचे करडे येथे नाथकृपा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स नावाने दुकान आहे. रविवारी रात्री ९:१५ वाजता ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. सोमवारी दुकाना समोर राहणारे संतोष टेमगिरे यांनी पहाटे ५ वाजता दिवेकर यांना दुकानाचे पूर्वेकडे असणारे शटर उघडे असल्याचे फोन करुन सांगितले. त्यावेळेस दिवेकर हे दुकानात गेले असता. दुकानात चोरी झाल्याचे त्यांचे लक्षात आले. दुकानातल्या गल्ल्यातून १०,५०० रोख रक्कम तसेच काही वस्तू चोरीला गेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

गावातील विनायक लक्ष्मण बांदल यांच्या बंद घराचा दरवाजा आणि डॉ. प्रशांत राजेंद्र लोखंडे यांच्या हॉस्पिटलचा दरवाज्याचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. तीन ते चार चोरटे हे मेडिकल मध्ये प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. चोरी करतानाचे फुटेज पोलिसांना दिले असल्याचे अजय दिवेकर यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गुरुनाथ घोगे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या