रांजणगाव पोलीसांकडून जिल्हयात मोठी कारवाई (Video)

रांजणगाव गणपती, ता.१४ अॉगस्ट २०१८ (तेजस फडके) : पुणे जिल्हयातील सर्वात मोठी कारवाई रांजणगाव पोलीसांनी केली असून एकुण २२ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असुन ७ आरोपी ताब्यात  घेतले आहेत.

याबाबत रांजणगाव चे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि,रांजणगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासुन दुचाकी व वाहन चो-यांचे गुन्हे वाढले होते.त्यामुळे या भागात दाखल असलेले गुन्हे उघडकिस आणण्यासाठी रांजणगाव पोलीस स्टेशन तपास पथकाला मार्गदर्शन केले होते.त्या अनुशंगाने तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवुन मागावर होते.तपासादरम्यान संभाजी बजरंग नायकोडी (रा.कवठे येमाई) यावर संशय बळावल्याने  ताब्यात घेउन पोलीस खाक्या दाखवताच पंकज दिलीप मावळे रा.मलठण याच्या साहाय्याने मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले.

अटक केलेल्या आरोपीकडे रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे,पोलीस नाईक अजित भुजबळ, पोलीस नाईक विनायक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमोडे, होमगार्ड किरण दाते, दिपक दंडवते या पथकाने इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान तपास पथकाने मुरबाड, सुपा, शिक्रापुर, चंदननगर, पुणे अशा विविध ठिकाणांहुन बुलेट, शाइन, स्प्लेंडर, पल्सर अशा सुमारे २२ दुचाकी वाहने जप्त केली आहे. तर संभाजी बजरंग नायकोडी (रा. कवठे येमाई), पंकज दिलीप मावळे (रा.लाखेवाडी, मलठण), प्रफुल्ल खटाटे (रा.टाकळी हाजी), अक्षय देवडे (रा. शिक्रापुर), अमित टिंगरे (रा. टाकळी हाजी), सुभाष वाळके (रा. चांभुर्डी, ता.श्रीगोंदा), पाराजी जासुद (रा. दहिटणे गुंजाळ, ता. पारनेर) यांना अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या आरोपींना (ता. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यात शिरुर,रांजणगाव, शिक्रापुर या तीनही पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन वाहनचोरीचे गुन्हे वाढले असून रांजणगाव पोलीसांनी आतापर्यंतची जिल्हयातील सर्वात मोठी पोलीस कारवाई केली असून पोलीस पथकाचे तालुक्यातुन अभिनंदन केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या