विद्यार्थ्यांनी नाटिकेतून दिला प्लास्टिक बंदीचा संदेश

Image may contain: 11 people, people smiling, people standing
विठ्ठलवाडी, ता. १७ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात श्री पांडुरंग विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून प्लास्टिक बंदीचा संदेश दिला.                        

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. श्री पांडुरंग विद्या मंदीराचे ध्वजारोहण माजी पोलीस पाटील चंद्रकांत गवारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे यांच्या हस्ते तर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच ललिता गाडे यांच्या हस्ते झाले.   

यावेळी आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.तसेच शिक्षक,ग्रामस्थ यांचे मनोगत झाले. दरम्यान श्री पांडुरंग विद्या मंदिराच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी प्रवीण जगताप व विशाल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नाटिका सादर करून प्लास्टिक बंदीचा संदेश दिला. शालेय विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे अशा घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने आजी माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते जांभळाची रोपे देऊन  सन्मान केला.

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, सरपंच ललिता गाडे, उपसरपंच बाबाजी गवारे,ग्रामपंचायत सदस्य जयेश शिंदे,तानाजी मारणे, माजी सरपंच अलका राऊत, कांतीलाल गवारे, कॅप्टन लोभाजी अल्हाट, माजी उपसरपंच दिलीप गवारे, राजेंद्र शिंदे, सोपान गवारे, काळुअण्णा गवारे, पोलीस पाटील शरद लोखंडे, संस्थेचे सचिव हरिश्चंद्र गवारे, उपाध्यक्ष लव्हाजी लोखंडे, मुख्याध्यापक सुरेश थोरात, ग्रामसेवक दादासाहेब नाथ, तलाठी गणेश घुमे आदी मान्यवर उपस्थित होते.   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या