सादलगाव 'अंगणवाडी' की 'कचरा डेपो'... (Video)

सादलगाव, ता. 17 ऑगस्ट 2018 (प्रतिनिधी): 'येथे कचरा टाकू नका'. 'कचरा कोण टाकतो? बालवाडीतील मुलांच्या आरोग्यावर टाकलेल्या कचऱयामुळे मोठा परिणाम होईल, कृपया येथे कचरा फेकू नका, असे सांगितल्यास हमखास भांडण आणि हमरीतुमरी ठरलेलीच. सादलगाव येथे स्वच्छतादूताची भुमिका पार पाडताना ग्रामपंचायत सदस्य अशोक लवांडे यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.


सादलगावमध्ये जुन्या अंगणवाडीच्या शाळेच्या भिंतीला टाकलेल्या कचऱयाचे ढिग बघितल्यानंतर ही 'अंगणवाडी की कचरा डेपो' असाच प्रश्न पडतो. येथे रोज बिनभोबाट कचरा टाकला जातो. कचरा टाकणारेच म्हणाले, की आम्ही नाही कचरा टाकत, तर मग कचरा कोण टाकतो. हा प्रश्न केला तर 'तो मी नव्हेच' अशी भुमिका कचरा टाकणाऱयांनी केली आहे. 'चोर तो चोर' आणि वरती 'शिरजोर' असाच अनुभव येथे कचरा समस्यावर काम करणाऱयांना येत असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा करु नये यासाठी समपुदेशन करण्याची व कार्यशाळा घेण्याची वेळ सध्या सादलगाव ग्रामपंचायतीवर आली आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियान' यशस्वीपणे राबविले जाताना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो तर काही ठिकाणी मात्र गाव अस्वच्छ ठेवण्याचा प्रकार घडताना समोर येत आहे. 'स्वच्छ भारत' या अभियानाला हारताळ फसणाऱयावर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारावाई करावी, तर यावर नक्की आळा बसेल, अशी मागणी सदस्य लवांडे यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या