विद्युत मोटरचा शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर, ता.१८ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : विद्युत मोटारचा शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार(दि.१७) रोजी रामलिंग येथे घडली.

या प्रकरणी बबन भिकाजी जमादार यांनी फिर्याद दिली असून संतोष जामदार (वय.३५) असे दुर्दैवी मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या संतोष जामदार यांस घराच्या समोर पाण्याची मोटार जोडत असताना लाईटचा शॉक बसला. लाईटचा शॉक बसल्याचे दिसताच त्यास तत्काळ खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासले असता, त्यास उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.

मयत संतोष याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बाळासाहेब खोमणे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या