चिंचणी येथील घोड धरण भरले 34 टक्के (Video)

निमोणे, ता. 18 ऑगस्ट 2018 (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात शुक्रवारी (ता. 17) रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत १८५० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, धरण 34% भरल्याची माहिती घोड शाखेचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी दिली.

कुकडी प्रकल्पातील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने डिंभा धरण गुरुवारी (ता. १६) रोजी सकाळी १० वाजता ९७% भरले. डिंभा धरणातून पाच दरवाज्याद्वारे घोड नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून वडज धरणातूनही घोड नदीत पाणी सोडल्याने सध्या सुमारे १६९०० क्युसेस वेगाने पाणी घोड धरणात येत आहे. धरणाच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

घोड धरणातून काही दिवसांपुर्वी खरीप हंगामासाठी आवर्तन चालू असून घोडच्या उजव्या कालव्यातून १४० क्युसेसने आणि डाव्या कालव्यातून २२५ क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. घोड धरणाची पाणी साठवण क्षमता ७ टीएमसी असून धरणात सध्या फक्त १.५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या