शिरुर पोलीसांकडून दारुभट्टयांवर कारवाई (Video)

Image may contain: 1 person, tree, plant, outdoor and natureशिरुर, ता.१९ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांच्या पथकाने कवठे येमाई येथे छापा टाकुन मोठ्या प्रमाणात कच्च्या रसायनासह दारुभट्टया उद्धव्स्त केल्या.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई परिसरात दारुअड्ड्यांविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंजाळवाडी परिसरात छापा टाकला.यावेळी पोलीसांना सुमारे  ३७ हजार ५०० रुपये किंमतीचे १० बॅरल मध्ये १५०० लिटर कच्चे रसायन दारु व साहित्य मिळुन ४४ हजार रुपये किंमतीचा माल मिळुन आला.पोलीसांनी जागीच रसायनासह मुद्देमाल नष्ट केला आहे.या कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलीस कॉंस्टेबल संजु जाधव,संजय साळवे, बाळासाहेब हराळ यांनी भाग घेतला.या प्रकरणी शिरुर पोलीसांनी दोघांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.

शिरुर तालुक्यात तीनही पोलीस ठाण्यांनी पोलीस अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील शिरुर, शिक्रापुर, रांजणगाव या तीनही पोलीस ठाण्यांनी गेल्या अनेक दिवसांपासुन दारुभट्टयांवरील कारवाया थंडावल्या आहेत. शिरुर पोलीसांनी पुन्हा दारुअड्ड्यांवर कारवाई सुरु केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या