गुजर प्रशालेतून सीमेवरील जवानांसाठी राख्या

Image may contain: 25 people, people smiling, people standingतळेगाव ढमढेरे, ता.१९ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्षाबंधनानिमित्त भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून २ हजार राख्या व शुभेच्छा पत्रे पाठविली.

शनिवार (दि.१८ ऑगस्ट) रोजी या सर्व राख्या व शुभेच्छा पत्रे आकर्षक असे पॅकिंग करून पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या. प्रशालेतील शिक्षिका सुनिता पिंगळे व हर्षदा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला. यावेळी प्राचार्य माणिक सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे यांनी कौतुक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या