'गुन्हेगारांचा कर्दनकाळ' ठरत आहेत राजू मोमीन

Image may contain: 1 person, closeupपुणे, ता. १९ अॉगस्ट २०१८ (सतीश केदारी) : गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करुन शेकडो गुन्हेगारांना गजाआड करण्याचे काम 'त्या' पोलीस अधिका-याकडून केले जात आहे. त्यामुळेच पुणे जिल्हयातील महत्त्वाचे गुन्हे  उघडकिस येऊ शकले आहेत.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेला गेल्या काही महिन्यांत अनेक गुन्हयांची उकल  करण्यास यश आले आहे. यांतील महत्वाच्या काही गुन्हयांत  गुन्हे उघडकिस आणण्याचे महत्त्वपुर्ण काम केलयं ते राजू मोमीन यांनी.

राजु मोमीन हे या पुर्वी रांजणगाव पोलीस स्टेशनला कार्यरत होते. प्रत्येक गुन्हयांचा सखोल अभ्यास अन् त्यानुसार गुन्हे शोधण्याची  पद्धत यांमुळे रांजणगाव पोलीस स्टेशनमधील अनेक चोरी, खुनांचा तपास लावण्यात आला. तर शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या एका खुनाचा तपास केवळ किरकोळ माहितीच्या आधारे लावून गुन्हेगाराला अटक करण्याची कामगिरी हि त्यांनी केली. त्यांच्या या गुन्हे उघडकिस आणण्याच्या कामाची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी त्यांची बदली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत केली. येथेही चांगल्या कामाची छाप पाडत पुणे जिल्हयात महत्वाचे दरोडे, चोरी, लुटमार यांबरोबरच खुनाची किचकट प्रकरणांचा तपास गुन्हे शोध पथकाला लावण्यात यश आले. आजपर्यंत अत्यंत किचकट परंतु थरारक गुन्हयांची उकलही मोमीन यांच्यामुळेच होउ शकली आहे.

थरारक १५ खुनांचा शोध, मोस्ट वॉंटेड दरोडेखोर पकडण्याबरोबरच जिल्हयातील २५ किचकट दरोड्यांचा तपास ही त्यांनी लावण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनीही केली असून मोमीन यांचा विशेष सन्मान ही करण्यात आला आहे. शेकडो गुन्हेगारांच्या मुसक्या मोमीन यांच्यामुळेच शक्य होत असुन ग्रामीण पोलीस दलात 'गुन्हेगारांचा कर्दनकाळ' म्हणून मोमीन यांची ओळख होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या