सणसवाडीत प्रेमप्रकरणातून सुपरवायझरने केला खून

Image may contain: food
सणसवाडी
, ता.२१ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) :
सणसवाडी (ता.शिरुर) येथे मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सुपरवायझर ने कामगाराचा खून केल्याची घटना घडली.

या घटनेत दामोदर कृष्णा जबल(सध्या.रा.सणसवाडी,मुळ रा.धारावी,मुंबई) असे मयत कामगाराचे नाव आहे. याबाबत शिक्रापुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेबर कॉंट्रॅक्टर अमित अभिमन्यु जाधव (रा.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

जाधव यांचे सणसवाडी येथील ईकाई व अॅलिकॉन कंपनीत लेबर कॉंट्रॅक्ट आहे.या कॉंट्रॅक्ट मधील इकाई कंपनी मध्ये संतोष शहाजी राठोड (रा. येडशी, ता. जि. उस्मानाबद) हा सुपरवायझर म्हणुन कामाला आहे. मयत दामोदर जबल हा कामगार म्हणुन काम करतो. शनिवारी (दि.१८)  जबल व राठोड  यांच्यात भांडणे झाली होती. हि भांडणे एका मुलीच्या प्रेमप्रकरणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. (दि.२० अॉगस्ट) रोजी दुपारी बाराच्या सुमारास सणसवाडीतील फिर्यादी जाधव यांना फोन आला कि, संचेती मसाला कंपनीजवळ जबल यांना चाकुने मार लागल्याने तो जखमी होउन रस्त्यात पडला आहे असे सांगितले. त्यानंतर जखमी दामोदर याला उपचाराकरिता त्याला दवाखान्यात नेले असता, तो मृत पावल्याचे सांगितले.फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन संतोष राठोड याने दामोदर कृष्णा जबल याला पोटात चाकुने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले असल्याचे नमुद केले आहे.

या खुन प्रकरणी अधिक तपास शिक्रापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या