ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य आदर्शवत: सुर्यकांत पलांडे

Image may contain: 12 people, people smiling, people standing and weddingसरदवाडी, ता.२१ ऑगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : ग्रामीण भागात ज्ञानदान करणा-या शिक्षकांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी केले.

सरदवाडी(ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर गायकवाड यांच्या सेवापुर्ती समारंभ साजरा करण्यात आला.यावेळी पलांडे हे बोलत होते.

यावेळी बोलताना पलांडे म्हणाले कि,शिरुर तालुक्याच्या जडणघडणीत ज्या काळी शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध नव्हत्या त्या काळी ज्ञानदानाचे कार्यही तितकंच अवघड होते.परंतु ग्रामीण भागात स्पर्धात्मक व दर्जेदार शिक्षण देउन पिढी घडविण्याचे कार्य शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षकांकडुन होत आहे.ग्रामीण भागात यामुळेच चांगली पिढी घडत आहे.यावेळी पलांडे यांनी किशोर गायकवाड यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.यावेळी माई पलांडे,आबासाहेब गव्हाणे बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे, शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, सरदवाडीचे विलास कर्डिले, उपसरपंच किशोर सरोदे, विठ्ठल शितोळे,मारुती कदम, दादासाहेब गवारे,दादासो मगर,सर्व शिक्षण संस्थाचे प्राचार्य,शिक्षक,सरदवाडीचे ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी पुष्पा सरोदे,सुभाष चौधरी,के.पी.जगताप,सरपंच विलास कर्डिले आदींची भाषणे झाली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या पुनमताई कुंडलिक व दत्ताञय कुंडलिक यांच्या हस्ते गायकवाड यांचा पुणेरी पगडी,शाल व श्रीफळ देउन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण गोरडे यांनी केले तर सुञसंचालन संदिप सरोदे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या