बालकांना पोषण आहारासाठी कंपन्या सरसावल्या

Image may contain: 2 people, people standingकारेगाव, ता.२२ अॉगस्ट २०१८ (सतीश डोंगरे) : ठाणे येथील अन्नदा संस्थेच्या वतीने व रांजणगाव येथील राधाकृष्ण फूडलँड प्रा.ली. या कंपनीच्या सहकार्याने कुपोषण मुक्त भारत हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून राज्यभरातील 17000 बालकांना सध्या हा पोषण आहार देण्यात येत आहे.

या प्रकल्पा अंतर्गतच कारेगाव ता.शिरूर येथील अंगणवाडीला पूरक पोषण आहार सुरू करण्यात आला. नुकताच या कार्यक्रमाचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती श्री. विश्वास आबा कोहकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी फूडलँड कंपनीचे वेस्ट विभागाचे मुख्य व्यवस्थपाक राज भावगे, युनिट व्यवस्थापक जयशंकर टांती, मनुष्यबळ  विभागाचे व्यवस्थापक अक्षय डोंगरे, अंकुश नवले, अन्नदा संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय मिश्रा तसेच कारेश्वर पतसंस्थेचे सचिव राहुल गवारे, शहाजी तळेकर, डॉ. आत्माराम गावडे, जयप्रकाश नवले, बंडू गवारे, भाऊसाहेब गवारे, प्रकाश गवारे, संतोष नवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते बालकांना पौष्टिक लाडूचे वाटप करण्यात आले. संस्थेचे समन्वयक संजय मिश्रा यांनी या वेळी अन्नदा संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

अन्नदा संस्था फूडलँड कंपनीच्या सहयोगाने चांगला उपक्रम राबवित असून या संस्थेला पंचायत समितीच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य कऱण्यात येईल असे सभापती विश्वास आबा कोहकडे यांनी सांगितले. बालकांना पोषण आहार सुरु करण्यात आल्या बद्दल या अंगणवाडी च्या वतीने सौ.सुरेखा नवले यांनी सर्वांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या