शिरुरला सर्वधर्मियांची संविधान सन्मान रॅली

Image may contain: 25 people, people standingशिरुर,ता.२२ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या निषेधार्थ शिरुर येथे संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीची सुरुवात शिवछञपती यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन शिरुर शहरातुन रॅली काढण्यात आली. शिरुर नगरपालिकेतील कर्मवीर भाउराव पाटील यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले तर भारताचे संविधान स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या संविधान सन्मान रॅलीत सर्वधर्मिय बांधव सामिल झाले होते.

शिरुर तहसिल कार्यालय येथे यावेळी अनेकांची भाषणे झाली. या वेळी रामभाउ झेंडे, मनोज गाडेकर, प्रमोद गायकवाड, प्रा. रमेश गायकवाड, संतोष नगरे, मायाताई गायकवाड, गोरख वेताळ, विजेंद्र गद्रे, विनोद भालेराव, राजेंद्र गायकवाड, राजु उबाळे, अनिल कांबळे, आनंद उघडे, सिद्धार्थ कांबळे, तुषार अडसुळ, सुरज पाचंगे, निलेश जाधव, बाबाराजे जाधव, दिपक हिंगे, नंदु जाधव, सागर सातारकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांना देण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या