बोऱहाडेमळ्यात स्विफ्ट कार-कंटेनरमध्ये मोठा अपघात

Image may contain: car and outdoorशिरुर, ता. २२ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर जवळील बो-हाडेमळा येथे स्विफ्ट डिझायर कार व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. माञ, यात स्विफ्ट डिझायर चे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.

या प्रकरणी संभाजी मोहन गजलवाड (वय. २४, रा. भोसरी, इंद्रानगरी) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजलवाड यांचा ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. मंगळवार(दि.२१) रोजी फिर्यादी यांना स्वारगेट ते शिर्डी असे भाडे मिळाले असल्याने ते त्यांच्या स्विफ्ट (एम.एच.१४ एफ.सी.१२३६) या वाहनातून दोन प्रवाशांना घेउन शिर्डीकडे जाण्यास निघाले होते.

गजलवाड यांचे वाहन शिरुर जवळ बो-हाडेमळा येथे वाहन आले असताना कंटेनर (ए.पी.२९ टी ७३९४) ने अचानक वळण घेतल्याने स्विफ्ट ला धडक बसून अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता कि यात स्विफ्ट चे मोठे नुकसान झाले. परंतु सुदैवाने आतील कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर भररस्त्यात सोडून फरारी झाला होता, यामुळे शिरुर पासुन दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागलेल्या.

शिरुर पोलीसांनी तत्काळ धाव घेतल्याने वाहतुक सुरळित करण्यात यश आले. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे वैभव मोरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या