शिरुर तालुक्यात बकरी ईद सण उत्साहात साजरा (Video)

शिरुर, ता. २२ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर शहरासह शिरुर तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.बकरी ईद सणाविषयी माहिती देताहेत शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक माजी पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी...

शिरुर शहरात बकरी इद निमित्त शिरुर पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.शिक्रापूर परीसरात बकरी र्इद उत्साहात साजरी करण्यात आली.शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील जामा मस्जीदमध्ये नमाज पठाण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.शिक्रापूरसह परीसरातील सणसवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखर्इ, कान्हूर मेसार्इ, निमगाव म्हाळुंगी, जातेगाव, कोंढापुरी, कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी आदी ठिकाणी मोठया उत्साहात नमाज पठण करून र्इद साजरी केली.

बकरी र्इद निमीत्त शिक्रापूर पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच मुस्लिम बांधवांना नमाजला जाताना व येताना रस्ता ओलांडताना अडथळा येवू नये म्हणून वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केले होते. नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी व सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या