पलांडे आश्रमशाळेने जवानांसाठी पाठविल्या राख्या

Image may contain: 11 people, people smiling, crowd and outdoor
मुखई, ता. 23 ऑगस्ट 2018 (एन.बी. मुल्ला): सीमेवर अहोरात्र जागता पहारा देवून भारतभूमीचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांसाठी मुखई (ता.शिरूर) येथील आश्रमशाळेने एक अनोखा उपक्रम राबवला असून, जवानांसाठी शाळेतील मुलींनी राख्या पाठविल्या आहेत.

भारतीय संस्कृती अनेकविध सण उत्सवांनी नटलेली संस्कृती प्रत्येक सणांचे वैशिष्ट्ये महत्व आगळे-वेगळे त्यापैकीच बहीण भावाचे पवित्र नाते जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, विश्वास, प्रेरणा उत्साह, संयमाचा संयोग होय. याच दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे मन प्रेमाने जिंकून, भावाच्या कर्तृत्वाला दाद देऊन भावाचा उत्साह वाढवून मन भरून शुभेच्छा देत असते.

आपल्या मनातील सैनिकाबद्दल असणारा आदर, आपले देशाबद्दल असणारे प्रेम, स्वतःच्या मातृभूमीतील जवानांबद्दल असणारी माया, स्वतःच्या कर्तव्याची असणारी जाणीव व्यक्त करण्यासाठी सर्व विद्यार्थांनी आपल्याजवळील प्रत्येकाच्या क्षमतेनुसार काही निधी संकलीत करुन शिक्षकांच्या मदतीने जवानांसाठी एकसारख्या व आकर्षक राख्या खरेदी केल्या. आपल्या मनातील आपुलकीचा स्वरचीत शुभसंदेश तयार करून भारतीय जवानांसाठी पोस्टाद्वारे राख्या व संदेशपत्र एकत्रीत सीमेवर रक्षाबंधन या पवित्र सणासाठी रवाना केल्या व वीर जवानांना शुभेच्छा दिल्या. या स्तूत्य व प्रेरणादायी उपक्रमाबददल  प्राचार्य तुकाराम शिरसाट, संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे, सचिव सुरेश पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे, मुख्य कार्यकारी मंगेश मोरे यांनी सांस्कृतीक विभागप्रमुख रेखा काळे, अनिता डमरे व सर्व शिक्षकांचे व विदयार्थाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या