चिंचणी येथून घोड धरणात सोडले पाणी (Video)

Image may contain: sky, ocean, cloud, bridge, water, outdoor and nature
चिंचणी, ता. 23 ऑगस्ट 2018 (तेजस फडके): येथील घोड धरणात बुधवारी (ता. २२) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७३९३ दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून धरण ९५.५१% भरल्याने बुधवारी धरणाचे ९ दरवाजे उघडून १०,४४० क्युसेसने पाणी घोड नदीपत्रात सोडण्यात आले, अशी माहिती घोड शाखेचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना दिली.


कुकडी प्रकल्पातील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने डिंभा धरणातून ७३९३क्युसेस तर वडज धरणातून ५५० क्युसेस पाणी घोड नदीपात्रात येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त पाणीसाठा ५४६७ दशलक्ष घनफुट आणि मृत पाणीसाठा २१७२ दशलक्ष घनफुट आहे. घोड धरणाला दोन कालवे असुन उजव्या कालव्याची लांबी ३० किमी आणि डाव्या कालव्याची लांबी ८४ किमी आहे. घोड धरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, काष्टी व श्रीगोंदा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेलेले आहे.

गेल्या अडीच महिन्यापासून शिरुर तालुक्यात समधनकारक पाऊस पडलेला नसल्याने घोडधरणातील पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परंतु सध्या धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या