खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील रस्त्यांची दुरावस्था

Image may contain: one or more people, motorcycle and outdoor
शिक्रापूर, ता. 24 ऑक्टोबर 2018 (एन.बी. मुल्ला): शिक्रापूर येथील रस्त्यांची दुरावस्था झालेली असून ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. खासदारांनी दत्तक घेतलेल्या कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौक, पुनर्वसन गावठाण, तळेगाव रोड व विद्याधाम प्रशाला समोरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने व सध्या पावसाळा असल्याने डबकी साचली आहेत. दुचाकीस्वारांना या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत असून पायी चालणेही जिकिरीचे होत आहे. विद्याधाम प्रशालेसमोरील रस्त्यावर डबकी साचल्याने विद्यार्थ्यांना सायकलवरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने सायकली व दुचाकी घसरती आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केले आहे.

कासारी रस्त्याची दुरावस्था
पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे, मात्र या गावाशी जोडल्या गेलेल्या सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे हे विशेष.
Image may contain: one or more people, people standing, people walking, outdoor and nature

कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने पावसामुळे या रस्त्याची आणखी दुरावस्था होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी डबकी साचल्याने व रस्ता चिखलमय झाल्याने कासारी येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्र्यांना सायकलवरून जाताना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांनाही या रस्त्याने प्रवास करणे जिकीरीचे होत आहे. पुणे-नगर महामार्गाला जोडणारा हा मार्ग असल्याने या रस्त्यावरून शेत मालाची व दुधाची वाहतुक मोठया प्रमाणात होते. रस्त्याच्या सार्इडप+याही तुटल्याने वाहतुकीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या