कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

Image may contain: 8 people, people smiling, people standing, tree and outdoorपुणे,ता.२४ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : आंतरराज्यीय गुन्हे करणा-या कुख्यात दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव एमआयडीसी येथील आयटीसी कंपनीचा सिगारेटचा माल घेउन जाणारा कंटेनर यास पजेरो गाडी आडवी लावुन कंटेनर थांबवुन कंटेनर चालकाला मारहान सुमारे १० लाखाचा माल चोरी गेला होता.हा गुन्हा पुणे नाशिक हायवेवर घडला असल्याने नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला होता.या गुन्हयातील तीन आरोपींना अटक  करण्यात आली होती तर मुख्य सुञधार सिद्धार्थ जन्मेजाई हा फरार होता.

त्याच्या मागावर पुणे ग्रामीण,रायगड, ठाणे,ए.टीएस मुंबई पथकाचे पोलीस होते.फरार कालावधीत शिक्रापुर-चाकण रस्त्यावर सिगारेटने भरलेला कंटेनर ड्रायव्हरचे अपहरण करुन लुटुन नेल्याबाबत चाकण चाकण पोलीस स्टेशनला अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता.या गुन्हयाचा तपास करत असताना हा गुन्हाही सिद्धार्थ जन्मेजाई नेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे पोलीस पथकाने या आरोपीची माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली.

हि माहिती गोळा करत असताना पोलीसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तुर्भे नाका, नवी मुंबई येथुन स्कोडा कार,मोबाईल फोन सह ताब्यात घेउन कसुन चौकशी केली असता, सुमारे ११ विविध पोलीस ठाण्यांनी गंभीर गुन्हयांची नोंद होती.तर ठाणे जिल्हयातील गुन्हयामध्ये सदर आरोपीस सात वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे.आरोपी सिद्धार्थ हा महागड्या वाहनांमधुन इतर साथीदारांसोबत कंटेनर चालकाचे अपहरण करुन कंटेनर मधील माल चोरत असे व गुन्हा करतेवळी परराज्यातील मोबाईल सिमकार्ड वापरत असे. या  आरोपीकडुन महाराष्ट्र व परराज्यात आणखीन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

हा तपास  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे,सहायक फौजदार दत्ताञय गिरमकर,पोपट गायकवाड,राजु मोमीन,सचिन गायकवाड यांच्या पथकाने लावला असुन आरोपीला ताब्यात घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या