पुलाच्या स्लॅपला भेगा पडल्याने चिंचणीकर चिंताग्रस्त (vdo)

Image may contain: 7 people, people standing
चिंचणी
, ता. 25 ऑगस्ट 2018 (तेजस फडके):
येथील घोड धरणाच्या शेजारी वाहतुकीसाठी पुल असून या पुलाच्या स्लॅपला भेगा पडल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. या पुलाची घोड पाटबंधारे विभागाचे पाहणी करुन त्याची दुरुस्ती करावी, यासाठी घोड शाखेचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांना ग्रामसेवक वाळके आणि सरपंच पारुबाई पवार वतीने निवेदन देण्यात आले आहे.

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाला जवळपास ५५ वर्ष झाले असून चिंचणी व श्रीगोंदा तालुक्यातील गावात जाण्यासाठी अनेक वर्षांपासून धरणाच्या शेजारी असलेल्या पुलाचा वापर वाहनचालक करतात. चिंचणी व श्रीगोंदा येथे जाण्यासाठी हा पुल म्हणजे जवळचा मार्ग आहे. परंतु, या पुलाच्या स्लॅपला भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून घोड पाटबंधारे विभागाने या पुलाची पाहणी करुन दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवसेनेचे ग्राहक संरक्षणचे तालुकाध्यक्ष अनिल पवार, पोलीस पाटील दिलीप पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास पवार, विकासोचे अध्यक्ष प्रवीण धावडे ग्रामपंचायत सदस्य नामदेव पवार व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

याबाबत घोड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'ग्रामस्थांनी दिलेले निवेदन वरिष्ठ कार्यालयात पाठवला असून त्याचा अहवाल येईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तो पर्यंत या पुलावरुन जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचा आमचा विचार चालू आहे. पुलाच्या दोन्ही बाजुला आम्ही तसे फलक लावणार आहोत.'

वाळू वाहतूकीमुळे भेगा?
चिंचणी येथे गेल्या अनेक वर्षांपासून रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक चालू आहे. त्यामुळेही या पुलाच्या स्लॅपलाला भेगा पडण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळु वाहतुक ट्रक, डंपर यांच्या साह्याने केली जाते. महसुल विभाग तसेच घोड पाटबंधारे खात याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने पुलाची दुरावस्था झाली असल्याचे काही ग्रामस्थांनी खाजगीत सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या