लंघेवाडी येथील ट्रान्सफॉर्मर गेला चोरीला (Video)

लंघेवाडी, ता. 26 ऑगस्ट 2018 (तेजस फडके): लंघेवाडी(ता. शिरुर)येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रा मधील शुक्रवार (दि२४) रोजी पहाटेच्या दरम्यान तांब्याच्या तारांची चोरी झाली असल्याची माहिती माजी सरपंच संतोष लंघे यांनी दिली.
 
निमोणे-करडे रस्त्याच्या लगतच लंघेवाडीच्या हद्दीत हे विद्युत रोहित्र असुन सुमारे १५ शेतकऱ्यांना यातुन विजजोड देण्यात आला आहे.रस्त्याच्या कडेलाच हे रोहित्र असल्याने आत्तापर्यंत ३ वेळा हे रोहित्र फोडुन तांब्याच्या तारांची चोरी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या लाईट नसल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली असुन महावितरणने  लवकरात लवकर रोहित्र बसवुन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या