'माहेर'च्या मुलींनी पोलिसांना बांधल्या राख्या

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoorशिक्रापूर, ता.२७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : शिक्रापूर पोलीस ठाण्यात माहेर संस्थेच्यावतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

वढु बुद्रुक(ता.शिरूर) येथील माहेर संस्थेतील अनाथ मुलींनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात येऊन येथील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव  साजरा केला.

यावेळी बोलताना शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की पोलिस हे जनतेचे मित्र असून पोलिसांना विनाकारण घाबरण्याचे काही कारण नाही. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलिसे जनतेला मदतच करत असतात. मुलींनी अन्याय अथवा अत्याचार सहन करू नये तर दृष्ट प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहनही यावेळी पोलीस निरीक्षक शेलार यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या