तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत गुजर प्रशालेचे यश

Image may contain: 15 people, people smiling, textतळेगाव ढमढेरे, ता.२७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश मिळविले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील गुजर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

या दोन्ही संघातील खेळाडूंना क्रीडाशिक्षक राजेंद्र भगत, गोरक्षनाथ वाळके, नंदा सातपुते, प्रियंका रणसिंग व राहुल भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा  ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे, प्राचार्य माणिक सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या