रामलिंग संस्थेचा रक्षाबंधन 'माहेर' व 'गोकुळ' संस्थेत

Image may contain: 15 people, people smiling, wedding and indoorशिरुर, ता. २७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहरात रामलिंग महिला उन्नती संस्थेच्यावतीने माहेर व गोकुळ वृद्धाश्रमात राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

रामलिंग महिला उन्नति बहुउद्देशीय संस्थेचा वतीने आज माहेर संस्थेत जाऊन तेथील मुलांना राख्या बांधण्यात आल्या व खाऊ वाटप करण्यात आले.रामलिंग महिला संस्थेचा अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मुलांना राखी पौर्णिमेचे महत्व पटवुन दिले.तसेच गोकुळ वृद्धाश्रमात जाऊन तेथेही वृद्धांसोबत राखी बांधून,खाऊ देण्यात आला.
Image may contain: 9 people, people smiling, people standing, people on stage, child and outdoor

या वेळी अचानक रक्षाबंधन साजरे झाल्याने अनेकांनी समाधानाचे भाव व्यक्त केले. या प्रसंगी सुनंदा घावटे, अर्चना घावटे, छाया जगदाळे, अर्चना कर्डिले, माया रेपाळे, सविता देशमाने, राणी शिंदे, अनुपमा दोशी, मनीषा पठारे, निजवे ताई, पुनम औटी, भारती तवर, गौरी पवार, राधिका घाडगे आदी महिला उपस्थित होत्या. विजय तवर यांनी सर्वांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या