शिरुर बसस्थानकात मनसेकडून रक्षाबंधन

Image may contain: 5 people, people smiling, people standingशिरुर, ता. २७ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर बसस्थानकात चालक-वाहकांना  मनसेच्यावतीने राख्या बांधुन रक्षाबंधन साजरा करण्यात आला. तर शिरुर पोलीस स्टेशनला आरोपींनाही राख्या बांधण्यात आल्या.
Image may contain: 18 people
शिरुर शहरात रक्षाबंधन चे औचित्य साधुन मनसेच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशन व शिरुर बसस्थानक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिरुर बसस्थानकात महिला वाहक व चालक यांना राख्या बांधण्यात आल्या.नेवासा येथील महिला वाहक सुलभा भुसे यांना यावेळी अश्रु अनावर झाले.तर शिरुर पोलीस स्टेशन येथेही पोलीस व होमगार्ड यांना राख्या बांधण्यात आल्या.आरोपी असले म्हणुन काय झाले तेही माणुस आहेच म्हनुन त्यांनाही बहिणीची उणीव भासु  नये म्हनुन महिलांकडुन रक्षाबंधन करण्यात आले.

यावेळी मनसेचे महबुब सय्यद,स्वप्नील माळवे, अविनाश घोगरे, संदिप कडेकर, डॉ. वैशाली साखरे, तारुअक्का पठारे, शारदा भुजबळ, रविंद्र गुळादे, आदित्य मैड तसेच शिरुर पोलीस स्टेशन येथे मनस्विनीच्या वैशाली गायकवाड, नम्रता गवारे, शैलजा दुर्गे, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके हे उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या