...त्यांच्या तब्बेतीसाठी नागरिकांचा वाघेश्वराला अभिषेक

Image may contain: 13 people, people standing
मांडवगण फराटा
,
ता.२८ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) :
श्रीगोंदा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे यांच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी यासाठी नागरिकांनी दिंडी काढुन श्री वाघेश्वराला प्रार्थना करुन अभिषेक केला.
 
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष व माजी आमदार तसेच सहकारमहर्षी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीबापू नागवडे यांच्यावर गेले तीन जूनपासून पुण्यातील रूबी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी वांगदरी ता श्रीगोंदा येथील ग्रामस्थ दर श्रावणी सोमवारी वेगवेगळया गावामध्ये दिंडी काढून प्रार्थना करतात.त्या अनुषंगाने सोमवार (दि.27) रोजी वांगदरी ते मांडवगण फराटा येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वर मंदीरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली होती.या वेळी शिवाजीबापू नागवडे यांचा मुलगा राजेंद्र नागवडे यांच्यासह ग्रामस्थांनी श्री वाघेश्वर मंदीरामध्ये अभिषेक करून शिवाजीबापू नागवडे यांची तब्येत सुधारावी अशी प्रार्थना केली.

शिरूरच्या पूर्वभागातील इनामगाव नजीक असणारे वांगदरी ता श्रीगोंदा येथील शिवाजीबापू नागवडे यांनी शिरूर तालूक्याच्या पूर्वभागामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये चांगलाच प्रेमाचा व कार्याचा ठसा उमटवला गेला आहे.राजकीय भेदभाव न करता त्यांनी अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.तसेच श्रीगोंदा तालूक्यामध्ये त्यांनी मुलामुलींच्या होणारया शैक्षणीक अडचणी पाहता श्रीगोंदा तालूक्यामध्ये अनेक गावागावामध्ये शैक्षणीक संस्था उभारल्या आहेत.तसेच श्रीगोंदा व शिरूरच्या पूर्वभागात साखर कारखाना नसल्यामुळे या भागातील शेतकरयांना इतर कारखान्यांना उस देण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागत होता पण शिवाजीबापू नागवडे यांनी या भागामध्ये श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना उभारण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्यामुळे हा कारखाना उभा राहिला व या भागातील अनेक शेतकरयांचे उस गाळपासाठी होणारया त्रासाला आता आळा बसला असल्याचे अनेक ग्रामस्थांनी  आपल्या भाषणातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी राजेंद्र नागवडे, मनीषा सोनवणे, बाबासाहेब फराटे, मदनदादा फराटे, लक्ष्मण फराटे, जगन्नाथ जगताप, दत्तात्रय फराटे, श्रीनीवास घाडगे, शंकर फराटे, गणपत फराटे, सुभाषपाटील फराटे, प्रभाकर घाडगे, जगन्नाथ फराटे, प्रकाश भोयटे, अशोक फराटे, अशोक जगताप, केशवआबा फराटे, रावसाहेब जगताप, खंडेराव फराटे, धनंजय फराटे,महेश शितोळे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या