श्री क्षेञ रामलिंगला दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

शिरुर, ता. २८ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : श्रावण महिन्याच्या तिस-या सोमवारी श्री क्षेत्र रामलिंग (जुने शिरुर) येथे 'रामलिंग महाराज कि जय' 'हर हर महादेव' च्या जयघोषात शिरुर शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

शिरुर शहरापासून तीन कि मीच्या अंतरावर रामलिंग मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते याशिवाय  दर सोमवारी व श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी रामलिंग मंदिरात येतात. श्रावण महिनात शिरुर शहर व परिसरातील शेकडो भाविक दररोज पहाटे पायी दर्शनासाठी रामलिंगला येत असतात.

सोमवारी पहाटे श्री रामलिंग महाराजांना अभिषेक करण्यात आला व त्यानंतर  मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.आज श्रावण महिन्यातील तिस-या सोमवार मुळे पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिरुर शहर व पंचक्रोशीतील अनेक नागरिक दर्शनासाठी पायी येत असतात.

शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनास श्रावण महिन्यात पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर, आंबेगाव या ठिकांणाहुन अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. शिरुर शहरापासुन तीन किलोमीटर अंतरावर असणा-या प्रभु श्री.रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासुन ते सायंकाळ पर्यंत भाविकांनी दर्शनास लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या. दर्शनास आलेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. भाविकांच्या गर्दीमुळे या परिसराला याञेचे स्वरुप आले होते. खेळणी, पाळणे, विविध प्रकारचे स्टॉल प्रसादाच्या दुकानांनी परिसर फुलुन गेला होता.अनेक  नागरिकांकडुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या