विशेष मुलांसोबत पञकार संघाचे अनोखे रक्षाबंधन

Image may contain: 4 people, people smiling, people sitting and people eatingशिरुर, ता. २८ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुका मराठी पञकार संघाने शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन मध्ये विशेष मुलांसोबत रक्षाबंधनचा सण साजरा केला.

प्रारंभी विशेष मुलांनी सर्व पञकारांना राख्या बांधल्या.यावेळी प्रा.सतीश धुमाळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विशेष मुलांच्या गरजा व शिक्षण याबाबत मत व्यक्त करत संस्थेस आगामी काळात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.प्रविण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या संस्थापिका राणी चोरे यांनी संस्थेतील विशेष मुलांची व उपक्रमाची माहिती दिली व आभार व्यक्त केले.

तर पञकार बांधवांच्या वतीने संस्थेतील विशेष मुलांना खाउ वाटप करण्यात आले.यावेळी शिरुर तालुका मराठी पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर, प्रा.सतीश धुमाळ, प्रविण गायकवाड, मुकुंद ढोबळे, सतीश केदारी आदी उपस्थित होते. अचानक शिरुर शहरातील पञकार बांधवांनी विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन साजरे केल्याने विशेष मुलांच्या चेह-यावर समाधानाचे भाव दिसुन आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या