कान्हूर मेसाईमधील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश (Video)

कान्हूर मेसाई, ता. 28 ऑगस्ट 2018 (तेजस फडके): येथील विद्या विकास मंडळाच्या विद्याधाम प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील २२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलंय त्यांच्याशी थेट संवाद साधलाय पत्रकार तेजस फडके यांनी...कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 10 विद्यार्थी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत, तर 12 विद्यार्थी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व कंसात गुण पुढीलप्रमाणे: उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी): प्रणव दळवी (256), साक्षी हंडारे (246), तेजस मिडगुले (230), किरण मिडगुले (222), प्राची पुंडे (216), प्रणव पुंडे (214), तन्विरा तांबोळी (246), ओम भंडारे (230), साक्षी चव्हाण (220), नूतन पुंडे (214). पूर्वमाध्यमिक (इयत्ता आठवी) ः प्रसाद पुंडे (234), शुभम मिडगुले (222), पीयूषा दंडवते (214), प्रतीक धुमाळ (192), धनश्री नाणेकर (178), वैष्णवी मिडगुले (172), सुधाकर गाजरे (222), श्रेयस रुके (218), जय पुंडे (196), वैष्णवी ढगे (182), कृणाल मांदळे (178), अथर्व नाणेकर (172) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना कविता रेडवडे, बेबीनंदा केंदळे, सीताराम मोहिते, प्रकाश चव्हाण, तृप्ती डावखर, विनोद शिंदे, अविनाश दौंडकर यांनी मार्गदर्शन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या