आलेगावला पोलिसांकडून प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन

Image may contain: 3 people, crowd
आंधळगाव, ता. ३१ अॉगस्ट २०१८ (प्रमोल कुसेकर): शालेय मुलींच्या  वारंवार घडणाऱ्या  विनयभंग व छेडछाडी घटना लक्षात घेउन (दि.२९) रोजी आलेगाव पागा (ता.शिरूर) येथील श्री.भैरवनाथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी न्हावरा पोलिस दुरक्षेञाचे पोलिस उपनिरीक्षक भगवानराव पालवे यांनी मुलींना विनयभंग व छेडछाडीच्या घटनांना कशाप्रकारे सामोरे जायला हवे याबाबत मार्गदर्शन केले. छेडछाडीच्या घटना वारंवार  घडत असतील तर याबाबत निर्भिडपणे आपल्या  पालकांना ताबडतोब माहीती द्यायला हवी. विद्यालयात मुलीच्या सुरक्षेसाठी तक्रार पेटी  तसेच सी.सी.टिव्ही कँमेरे तत्काळ बसविण्यात यावे असे आवाहन पालवे यांनी केले.

पोलिस उपनिरीक्षकांनी सांगितलेल्या सर्व सुचना लक्षात घेऊन विद्यालयात महिला दक्षता समितीची ताबडतोब  स्थापना करण्यात येईल असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातुन प्राचार्य तुकाराम बेनके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जी.एस. घोगे, भारगळ, भरत पवार, देवराम वाघचौरे, राजुकाका गुळवे, ज्ञानेश्वर वेताळ, विशाल अवचिते, संतोष हिंगे, प्रा. संतोष शेळके, सुप्रिया काळभोर, ज्योती गजरे, नितीन गरुड, दिलीप वाळके, अंबादास आदी मान्यवर उपस्थित होते. सुञसंचालन प्रा. गोरक्ष डूबे यांनी केले तर आभार संभाजी कुटे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या