कराटे स्पर्धेत शिक्रापूर परीसरातील शाळांचे यश

Image may contain: 17 people, people smiling, people standing and outdoorतळेगाव ढमढेरे, ता.३१ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत शिक्रापूर परीसरातील शाळांनी भरघोष यश मिळविले.

पुणे जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव गणपती(ता.शिरूर) येथे तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.14, 17 व 19 वर्षाखालील वयोगटात व विविध वजन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेत यश मिळविलेल्या शिक्रापूर परीसरातील शाळा व त्यांचे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : – स्वातंञ्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे : नेहा भांडवलकर(प्रथम), र्इशा जरे (द्वितीय). अजिंक्यतारा इंग्लिश मेडियम स्कूल शिक्रापूर : नमीरा मुल्ला (प्रथम). अमॄतवेल ग्लोबल स्कूल शिक्रापूर : रोहन पिंपरकर, त्रिशाली ढमढेरे(प्रथम), रिया चौरसीया(द्वितीय), पूर्वा मुळे (तॄतीय). ग्लोरी इंग्लिश मेडियम स्कूल कोरेगाव भिमा : रोहीत सासवडे, समर्थ चौधरी, अथर्व मोरे(प्रथम), कार्तीक सासवडे (द्वितीय), रोहन सासवडे(तॄतीय). विद्याधाम प्रशाला शिक्रापूर : मॄणालीणी रायकर, ओंकार वाळुंज, गणेश दाते, चेतन पवार, स्नेहल वाळुंज, शुभम शिंदे (प्रथम), मोहीनी आघाव, विजया दाते, ऋषिकेश दाते(द्वितीय)|रसिकभाउ धारीवाल माध्य. विद्यालय गणेगाव खालसा : वैष्णवी बेंडभर(प्रथम), साहिल जाधव(तॄतीय).प्राथ. शाळा गणेगाव खालसा :ओम पांढरकर(प्रथम).सर्व यशस्वी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सीताराम चव्हाण, संजय शिंदे, मच्छिंद्र खैरनार, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शिरूर बाजार समीतीचे संचालक बाबासाहेब सासवडे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या