पोलीस कर्मचा-यामुळे अपघातग्रस्ताला तत्काळ मदत

Image may contain: 1 personशिरुर, ता.१ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : अपघातात डोक्याला मार लागुन रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्ताला शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचा-यामुळे तत्काळ मदत मिळू शकली.

सविस्तर माहिती अशी कि,शुक्रवार (दि.३१) रोजी शिरुर-चौफुला रस्त्यावर आंबळे गावाजवळ दुचाकी घसरुन एक इसम रस्त्यावर पडला होता. या इसमाच्या डोक्याला मार लागल्याने रक्त वाहु लागले होते.बघ्यांची गर्दी जमू लागली होती. दरम्यान मांडवगण पोलीस चौकीचे जमादार आबासाहेब जगदाळे यांना शिरुर पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार डयुटीवर जायचे असल्याने याच रस्त्याने चालले होते. अपघात घडल्याचे व जखमीच्या डोक्याला मार लागला असल्याचे  दिसल्याने जगदाळे यांनी तत्काळ थांबुन स्थानिकांना मदतीसाठी विनंती केली. यावेळी नागरिकांनीही तत्काळ मदत करत एका वाहनात जखमीला रुग्णालयात हलविले होते.

अपघात घडल्यानंतर अनेकदा मदतीसाठी कोणीच पुढे येत नसल्याच्या घटना घडत  असताना स्थानिक नागरिक व पोलीस हवालदार आबासाहेब जगदाळे यांना कामास उशिर होत असताना आधी त्यांनी तत्परता दाखवल्यामुळेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्ताला तातडीची वैद्यकिय सेवा मिळु शकली. यावेळी काही नागरिकांना 'वर्दीतली माणुसकी' दिसुन आली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या