सकल मराठा समाजाचे पोलीसांना निवेदन (Video)

Image may contain: 16 people, people smiling, people standing and outdoorशिरुर, ता. १ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : सकल मराठा समाजबद्दल आपशब्द बोलल्याबद्दल पारनेर तालुक्याचे आमदार विजय औटी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिरुर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, रविवारी (दि. २६) वडनेर बु.,ता.पारनेर येथे विजयराव औटी यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विजय औटी यांनी केलेल्या  अतिशय गंभीर व बेजबाबदार वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण करणे,सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या मागण्यांचे निवेदन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांना देण्यात आले. यावेळी राहुल शिंदे, योगेश ओव्हाळ, अविनाश घोगरे, अविनाश जाधव, विजय लोखंडे, अमोल गाडेकर, मंगेश कवाष्टे, निलेश वाघ, श्रीराज पोटावळे, अशिष पठारे, शैलेश पवार, संदिप कडेकर आदी उपस्थित होते.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या