मांडवगणला भीमानदीपाञात आढळला अनोळखी मृतदेह

No automatic alt text available.
मांडवगण फराटा, ता. २ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) :  मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे भिमानदीच्या पात्रामध्ये अनोळखी मॄतदेह आढळून आला  आहे.

याबाबत मांडवगण फराटा पोलीसांना तंटामूक्तीचे अध्यक्ष हनुआण्णा फराटे यांनी माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीसांनी जाउन पाहणी करून पंचनामा केला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे,(दि.१) मांडवगण फराटा येथील भिमानदीपाञात लिफ्ट एरियाजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला,जवळ जाउन पाहिले असता मृतावस्थेत पालथा पडलेला आढळुन आला.त्यावेळी त्यांनी तत्काळ मांडवगण पोलीस चौकीच्या पोलीसांना कळविले.

पोलीसांनी घटनास्थळी येउन पाहणी केली असता,सदरचा अनोळखी मॄतदेह व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून पायामध्ये व कमरेमध्ये करगुटा बांधलेला आहे व फूल भायाचा पांढरा शर्ट व अंडरवेअर या अनोळखी मॄतदेहाच्या अंगावर आढळून आली आहे.

अनोळखी व्यक्तीची माहिती मिळाल्यास शिरूर किंवा मांडवगण फराटा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले असुन पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मागदर्शनाखाली पोलीस हवालदार आबासाहेब जगदाळे,श्रावण गुपचे, अशोक तारू हे करत  आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या