शिरूरमध्ये पुर्वीच्या भांडणातून एकास जबर मारहाण

Image may contain: one or more peopleशिरुर, ता.२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणांवरून युवकास दोघांनी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी एका अल्पवयीन युवकासह चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. महेश शिवाजी मल्लाव (वय २८ रा. काची आळी शिरूर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असुन या प्रकरणी सचिन शिवाजी मल्लाव यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बंधु महेश मल्लाव (दि.३१)रोजी रात्री  हे मोटारसायकल वरून व्यापारी संकुला जवळ मोबाईल दुरुस्तीसाठी आले असता अक्षय बेंद्रे (वय.२२ रा.कामाठीपुरा), शुभम दळवी (वय.२४ रा.शिरुर) व एका अल्पवयीन युवकाने हातातील दांडक्यानी महेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत डोक्याला व तोंडाला मार लागून या हल्लयात महेश हा गंभीर जखमी झाला. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरीता पुणे येथे नेण्यात आले.

महेश मल्लाव व अक्षय बेंद्रे यांची (दि.२८) ऑगस्ट रोजी काची आळीतील दुर्गा देवीचे मंदिराजवळ गल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमात किरकोळ भांडणे झाली होती. या भांडणावेळी महेश व अक्षय बेंद्रे (रा.कामाठीपुरा शिरूर) व त्याचे मित्र यांच्यात वादावादी झाली होती. ती भांडणे आपापसांत मिटली होती व भुषण मुत्याळ याने भांडण मिटवण्यासाठी बोलावले असल्याचे फिर्यादीत सचिन यांनी म्हटले आहे. दरम्यान मल्लाव यांना झालेल्या मारहाणीचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. शहरातील भरमध्यवस्तीत या प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी शिरुर पोलीसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असुन दोघांना ताब्यात घेतले असुन एक अल्पवयीन आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या