तहसिलदारांच्या गाडीचा पाठलाग करणा-याविरुद्ध तक्रार

Image may contain: car, tree and outdoor file phtoo
शिरूर, ता.३ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुरच्या तहसिलदारांच्या गाडीचा पाठलाग करणा-या वाहनाविरुद्ध तहसिलदारांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

याविषयी तहसिलदार रणजित भोसले यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार, रविवारी (दि. 2) दुपारी ३ वाजता शिरुर कार्यालयातील काम आटोपुन स्वत:च्या खासगी वाहनाने कोरेगाव भिमा कडे जात असताना, एक इनोव्हा एम.एच.१६ बी.वाय.००७७ ही गाडी सातत्याने पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले. कोरेगाव भिमा येथे आले असता अप्पर जिल्हाधिका-यांचा आदेश आल्याने वाहन पुन्हा वळविले असता, सदरचे वाहन सुद्धा तहसिलदारांच्या गाडी मागे येउ लागली.

सणसवाडी येथे तहसिलदारांनी गाडी पेट्रोलपंपामध्ये वळविली तरीही ती गाडी तेथे आली. त्यानंतर गाडीत कोण आहे हे पाहण्यासाठी उतरले असता त्या वाहनाने पळ काढला. सदर गाडीत  दोन व्यक्ती बसल्या असल्याचे तक्रारी म्हटले असुन वाळू माफीयांचे असुन अनधिकृत वाळू वाहतुक करणे शक्य व्हावे यासाठीच माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांनी पोलीसांनी लेखी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या