पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन (Video)

शिरुर, ता. ३ सप्टेंबर २०१८ (सतीश केदारी) : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिरुर शहर व शिरुर तालुका राष्ट्रवादीने तहसिल कार्यालय येथे आंदोलन केले.


प्रारंभी शिरुर शहरातुन हातगाडीवर दुचाकी टाकुन निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांची भाषणे झाली. या आंदोलनास शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे, पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, विद्या भुजबळ, शहराध्यक्षा पल्लवी शहा, संगिता शेवाळे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, दत्ताञय फराटे, कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, कार्याध्यक्ष रंजन झांबरे, सागर निंबाळकर, सरदवाडीचे सरपंच विलास कर्डिले, निलेश पवार, अजय जगदाळे, संतोष भंडारी, हर्षद ओस्तवाल, राहिल शेख, प्रतिक काशिकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.या वेळी मागण्यांचे निवेदन शिरुर चे नायब तहसिलदार एस.यु.शेख यांना देण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या