घरफोडी करणा-यास रांजणगाव पोलीसांनी पकडले

रांजणगाव गणपती , ता.४ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : घरफोडी करणा-या परप्रांतीय चोरास रांजणगाव पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रांजणगाव पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या घरफोडीत स्मार्ट फोन व रोख चोरुन गेल्याचे म्हटले होते. याबाबत विजय गवारे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

या दाखल गुन्हयाचा तपास करताना रांजनगाव पोलीसांनी आशिष दिनेशकुमार दिवेदी(सध्या रा.कारेगाव, मुळ- मध्यप्रदेश) हा एमआयडीसीत येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचुन अटक केली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस नाईक प्रफुल्ल भगत, पोलीस कॉंस्टेबल मंगेश थिगळे, उमेश कुतवळ, उद्धव भालेराव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास अनिल चव्हान हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या