शिरसगावच्या दोन शिक्षकांचा जि.प.कडून होणार सन्मान

शिरसगाव काटा, ता.४ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : पुणे जिल्हा परिषदेने जिल्हयातील गुणवंत शिक्षकांची यादी जाहिर केली असून शिरसगावच्या दोन शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे.

शिष्यवृत्ती परिक्षेत उत्कृष्ट मार्गदर्शन करणा-या शिक्षकांसह गुणवंत शिक्षकांची नावे पुणे जिल्हा परिषदेने नुकतीच जाहिर केली आहे. शिरसगाव काटा येथील जि.प.शाळेतील शिक्षिका सुवर्णा नलगे, चव्हानवाडी येथील शाळेचे शिक्षक दादाभाउ दिवटे यांनाही पुरस्कार जाहिर झाला आहे. शिक्षकदिनी हा सन्मान दिला जाणार आहे.

या सन्मानाबद्दल शिरसगाव काटाचे सरपंच सतीश चव्हान, शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे, सोसायटीचे चेअरमन अण्णासो कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कदम, माजी पं.स.सभापती दादा कोळपे यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या