विक्रम भुजबळ यांनी समाजापुढे ठेवला आदर्श!

Image may contain: 10 people, people standing
शिक्रापूर, ता. 4 सप्टेंबर 2018 (प्रतिनिधी): शिक्रापूरमधील मलठण फाटयावर पाच एकरामध्ये वसलेल्या सिद्धिविनायक नगरमधील रहिवाशांचा विजेचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, उद्योगपती व सी. एस. भुजबळ ग्लोबल स्कूलचे डायरेक्टर विक्रम चंदरराव भुजबळ यांनी वीजेच्या ट्रान्सफरसाठी स्वतःची जागा देऊन रहिवाशांची अडचण सोडवली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःची जागा देऊन भुजबळ यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

मलठण फाटयावरील पाच एकरामध्ये सिद्धिविनायक नगर वसले आहे. मात्र, येथील नागरिकांना वीजेच्या मोठया अडचणीला समोर जावे लागत होते. नागरिकांची होणार अडचण विक्रम भुजबळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरीत स्वतःच्या जागेत विजेच्या नविन ट्रान्सफारमर बसविण्यासाठी जागा दिली. नविन ट्रान्सफारमर बसविल्यामुळे सिद्धिविनायक नगरमधील 350 रहिवासी वीजेच्या अडचणीतून मुक्त झाले आहेत. सिद्धिविनायक नगरमधील प्रत्येक वीजेच्या खांबावर बल्प लावल्यामुळे सिद्धिविनायक नगर प्रकाशमय झाले आहे. शिवाय, सिद्धिविनायक नगर मधील मुलांच्या शिक्षणासाठी भव्य अशी स्कूलची इमारत उभारली आहे.

सिद्धिविनायक नगरमध्ये दिवसांदिवस घरे वाढत असून, कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता. शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य पै. सागर सायकर यांनी पुढाकार घेऊन तो प्रश्नही मार्गी लावला आहे. भुजबळ व सोमनाथ तात्या सायकर यांनी परिसरात पुढाकार घेऊन गणपती मंदिर उभारले आहे. 2014 साली गणपती मुर्तीची स्थापना केली आहे. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, गोकुळ अष्टमी असे धार्मिक कार्यक्रम येथे राबविण्यात येतात. या वर्षी भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली व सर्वाच्या सहमतीने समितीची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, भुजबळ यांनी केलेल्या कामामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून, परिसरातून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

समिती पुढीलप्रमाणेः
1) अध्यक्ष- बाळासाहेब लोखंडे
2) उपाध्यक्ष - सुदाम गजे
3) खजिनदार - भगवान पवार
4) सह.खजिनदार - दत्तात्रय भुजबळ
5) सेक्रेटरी - अतुल ताठे
6) सह.सेक्रेटरी- मच्छिंद्र नरवडे
7) सचिव- दत्तात्रय सांळूके
8) सह. सचिव- स्वप्निल गरुङ

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या