राज ठाकरे म्हणाले, बांदल तुम्ही कृष्णकुंजवर याच! (Video)

Image may contain: 14 people, people smiling, people standing
शिक्रापूर, ता. 5 सप्टेंबर 2018 (प्रतिनिधी): तुम्ही कृष्णकुंजवर याच! भारी वाटलं तुमचं भाषण आणि संवादकौशल्य पण. आमच्या रमेश वांजळेंची आठवण तुम्ही करुन दिलीत. लोकसभेच्या उमेदवारीचं काय ते पुढं बघू. पण एकदा भेटा, असे खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे निमंत्रण पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दिले.

राज ठाकरे यांनी यांना मंगलदास बांदल यांना थेट कृष्णकुंजचे निमंत्रण दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिरूर तालुक्यात चर्चेला उधान आले आहे. सोशल मीडियावरून राज ठाकरे व बांदल यांच्यामधील संवादाचा व्हिडिओ व्हॉयरल होत आहे. सोशल मीडियावर राज ठाकरे व बांदल यांचे मोठे चाहते आहेत. यामुळे संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.

ओतूर (ता.जुन्नर) येथे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्या एका कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापुढे ’तुम्ही फक्त हो म्हणा, शिरुरचा खासदारही तुमचाच होईल..’ असे म्हणून स्वत:च्या लोकसभा उमेदवारीची मागणी राज यांच्याकडे केली. बांदलांच्या भाषणाने मनसेचे स्टार आमदार दिवंगत रमेश वांजळे यांची आठवण नक्कीच राज ठाकरेंना झाली. राज ठाकरे हे भाषणासाठी बोलायला जाण्याआधी व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी बांदलांना जवळ बोलाविले. बांदल काहीतरी यांच्या कानात कुजबुजले. यात त्यांनी थेट घरी येण्याचे निमंत्रण दिल्याचे बांदल यांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदार घातील शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना गेल्या तीन निवडणुकांत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने जंग-जंग पछाडले. पण त्यात अपयश आले. उलट त्यांच्याविरोधात आता कुठल्याच पक्षात कुणीच उमेदवार इच्छुक नसल्याची स्थिती सध्यातरी आहे. माजी सभापती मंगलदास बांदलांचा विचार केला तर राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य, भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी (सन २००९), पुन्हा राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापतीपद आणि पुन्हा राष्ट्रवादीकडून हकालपट्टी असा प्रवास केला आहे. तरीही गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पत्नी रेखा यांना अपक्ष म्हणून विक्रमी मतांनी जिल्हा परिषदेत पाठविले. योग्य वेळी योग्य चाली खेळत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्यात त्यांनी आतापर्यंत यश मिळवले आहे. सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवत आपला प्रभाव दाखवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

बांदल हे भाषण करण्यात तरबेज आहेत. बांदल यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेकजण अतुर असतात. त्यांच्या भाषणाच्या क्लिप मोठ्या प्रमाणात व्हॉयरल होत असून, नेटिझन्सनकडून त्यांना मोठी पसंती मिळत आहे. ठाकरे यांचे आमंत्रण बांदल स्विकारून ते कृष्णकुंजवर जातील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेकडून बांदल यांना खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली तर आगामी निवडणूकीतील चित्र नक्कीच बदलले असेल, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या