शिरूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

शिरुर, ता. ६ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर नजीक (बो-हाडेमळा) येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

या प्रकरणी सागर बोराडे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.तरया अपघातात श्रावण बोराडे (वय.२२, रा.गाडेगाव, ता.बार्शी, जि.सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांना मोबाईलवर श्रावण बोराडे यांचा अहदमदनगर -पुणे महामार्गावर बो-हाडेमळा येथे अपघात झाला असल्याचे रमेश बोराडे यांनी सांगितल्यानंतर तेथे फिर्यादी जाउन पाहिले असता, अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी होउन रस्त्यावर पुरुष जातीचे प्रेत चेंदामेंदा झाले असल्याचे दिसले.सदर प्रेतच्या पॅंटच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरुन सदर व्यक्ती श्रावण बोराडे असल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या अपघाताची माहिती कळताच शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेउन घटनास्थळाचा पंचनामा केला. तर याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या