शिरुरला आजपासून शेतमाल खरेदी करणार

शिरुर, ता.६ सप्टेंबर २०१८ (प्रतिनिधी) :  गेल्या अनेक दिवसांपासुन खरेदीदार व्यापा-यांनी पुकारलेला बंद मागे घेतला असून आज (दि.६) पासून पुन्हा शेतमाल खरेदी व्यवहार सुरु होणार आहे.

राज्यशासनाने (दि.२८) रोजी आडते व्यापा-यांनी आधारभूत किंमती पेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्यास दंडाची व शिक्षेची तरतूद केली असल्याचे आदेश काढण्यात आले ; यानंतर राज्यभरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा देत शिरूर येथील व्यापा- यांनी शेतीमाल खरेदी बंद केली होती. याबाबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पणन संचनालय. महाराष्ट्र राज्य यांनी यांनी असा कोणताही आदेश शासनाने अद्यापपर्यंत निर्गमित केलेला नसल्याचे पत्र दिल्याने येथील व्यापारी महासंघाने पुकारलेला बाजार बंदचा निर्णय मागे घेण्यात आला असल्याचे व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी यांनी सांगितले.

शिरूर येथील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सभापती शशिकांत दसगुडे,सचिव अनिल ढोकले, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, संचालक प्रविण चोरडिया, प्रकाश सुराणा, सुनिल गादीया, राजेंद्र दुगड, सुनील बरमेचा, राजेंद्र भटेवरा, संतोष सुराणा, अदि.व्यापा-यांची बैठक झाली. या नंतर व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी यांनी शुक्रवार दि.६ पासुन शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या